जीवनाच्या सर्व क्षेत्रांत, म्हणजे ज्ञान-विज्ञान, औपचारिक शिक्षण, लोकशिक्षण, प्रबोधन, राजकारण या सार्यांमध्ये एक मूलभूत बदल आवश्यक आहे (उत्तरार्ध)
वास्तव वा सत्य काय याचे निर्णय केवळ विचार, कल्पनाप्रणाली, सिध्दांत, प्रचार, भाषा, जाणीव, यांनी करता येत नाहीत. वस्तुनिष्ठ सत्य हे केवळ बाह्य जगाची नक्कल, प्रतिबिंब वा प्रतिमा निर्माण करणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. तर ‘सत्य’ हे माणसांनी जग व परिस्थिती आकळून, समजून घेऊन ते बदलण्याशी, त्या बदलण्यात ‘सत्य’ गवसण्याची, एवढेच नव्हे तर ते ‘निर्माण’ करण्याशी आणि त्याचे ज्ञान होण्याशी ते जोडलेले आहे.......